अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच तिने तिचा पती निक जोनाससोबत रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने तिच्या वीकेंड गेटवेची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.
प्रियंका स्वत: क्लिप शूट करत आहे आणि निक जोनास तिच्या खांद्यावर डोके ठेवून उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. निकला पाहून प्रियंका हसायला लागते. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. दोघांनी कॅप्स घातल्या आहेत. प्रियंकाने ओव्हरकोट घातला आहे. चष्माही लावला. तिने तिचा लूक अतिशय साधा ठेवला आहे. तिचा हा नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये निक आणि मालती मेरी एकत्र दिसत आहेत. दोघेही लाकडाशी खेळताना दिसले. मालती मेरी देखील ब्लॅक जॅकेट, पांढरी पँट आणि ब्लॅक कॅपमध्ये दिसली. प्रियंका काही दिवसांपासून आपल्या मुलीचा चेहरा दाखवत नाहीये. यावेळीही त्यांनी तोंड दाखवले नाही. प्रियांकाची ही कौटुंबिक सहल एखाद्या उद्यानात झाल्याचे दिसते.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, प्रियंका सध्या रुसो ब्रदर्सच्या सिटाडेलच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग करत आहे. ही अभिनेत्री हेड्स ऑफ स्टेटमध्येही दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री द ब्लफ या चित्रपटातही दिसणार आहे. ब्लफच्या शूटिंगदरम्यान मालती मेरीलाही ती सोबत घेऊन गेली होती. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती.