प्रियांकाला लहानपणी ‘कामवाली बाई’ बनण्यात इंटरेस्ट होता. दचकलात ना? पण खरे आहे. एका मुलाखतीत तिने स्वत:च हे सांगितलेय. BUILD LDNला अलिकडे तिने मुलाखत दिली. यात ती अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसली. पहिला जॉब? पहिला बिग ब्रेक? असे अनेक प्रश्न. यात एक प्रश्न होता, ‘फर्स्ट थिंक यू वॉन्टेट टू बी?’ असा. या प्रश्नावर प्रियांकाने न लाजता, ‘मेड’ अर्थात ‘कामवाली बाई’ असे उत्तर दिले. मला लहानपणी ‘कामवाली बाई’ बनावेसे वाटायचे. तेव्हा मला ‘कामवाली बाई’ बनण्यातच इंटरेस्ट होता. माझी आई यामुळे चिंतेत असायची. पण मी मज्जेत. कारण मला स्वच्छता करणे, झाडू लावणे मनापासून आवडते. मी लहानपणी घर स्वच्छ करायचे. झाडू मारायचे. माझ्यामते, यात वाईट काहीच नाही. मी आजही माझ्या घराची स्वच्छता स्वत: करते, असे तिने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
एकंदर काय, तर यशाच्या शिखरावर पोहोचूनही प्रियांकाचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत, हेच तिच्या या उत्तरातून दिसते. तुम्हाला काय वाटते?