बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा कायमच चाहत्यांची मनं जिंकून घेत असते. हॉलिवूड सिंगर निक जोनससोबत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली असली तरीही प्रियांकाचा देसीपणा कमी झालेला नाही. अजूनही प्रियांका तिचे संस्कार विसरलेली नाही. तिच्या मनात हिंदू धर्माबद्दल आस्था आहे. हे अभिनेत्री वारंवार तिच्या कृतीतून दाखवून देत असते. प्रियांका भारतात आल्यानंतर प्रार्थना स्थळांना भेटी देत असते. नुकतंच तिने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. पण, यावेळी प्रियांकाच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
बिझी शेड्युलमधून वेळ काढत प्रियांका सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली. यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. डोक्यावर ओढणी घेत श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्या चरणी प्रियांका नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं. पण, फक्त दर्शन घेऊन प्रियांका थांबली नाही. तर तिने त्यानंतर सुवर्ण मंदिरात सेवाही केली. आशीर्वाद घेतल्यानंतर प्रियांकाने लंगर हॉलमध्ये काही वेळ भांडी घासली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, प्रियांका एसएस राजामौलींच्या वाराणसी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात प्रियांकासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ७ एप्रिल २०२७ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच वाराणसी सिनेमाच्य सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Web Summary : Priyanka Chopra visited the Golden Temple in Amritsar, showcasing her devotion. She participated in seva, washing dishes in the langar hall. Her humility is being widely praised. She will appear in SS Rajamouli's Varanasi film.
Web Summary : प्रियंका चोपड़ा ने अमृतसर के स्वर्ण मंदिर का दौरा किया, अपनी भक्ति का प्रदर्शन किया। उन्होंने लंगर हॉल में बर्तन धोकर सेवा में भाग लिया। उनकी विनम्रता की व्यापक रूप से प्रशंसा हो रही है। वह एस एस राजामौली की वाराणसी फिल्म में दिखाई देंगी।