Join us

प्रियंका चोपडा म्हणते, ‘दिल है हिन्दुस्तानी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 21:55 IST

सध्या देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्या नावाचा सर्वदूर बोलबाला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणाºया प्रियंकामधील देसीपण किंचितही ...

सध्या देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्या नावाचा सर्वदूर बोलबाला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणाºया प्रियंकामधील देसीपण किंचितही कमी झालेले दिसत नाही. दस्तुरखुद्द प्रियंकानेच हे मान्य केले असून, तिने म्हटले की, जेव्हा ती भावुक होते तेव्हा ती देसी बनते. कारण मी जगाच्या कुठल्याही कानाकोपºयात असल्यास मी मनाने भारतीयच असते. फॅशन स्टार प्रियंकाने अमेरिकेतील टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मध्ये एलेक्स पेरिसची भूमिका साकारून हॉलिवूड प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे तिला ‘बेवॉच’सारख्या चित्रपटात व्हिक्टोरिया लीड्स ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या प्रियंका याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दहा दिवसांसाठी भारतात आली आहे. यावेळी जेव्हा तिला, ‘पडद्यावर भूमिका साकारताना त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने म्हटले की, ‘प्रत्येकवेळी माझ्याबाबतीत असे घडत असते. कल्पना करा, मी ‘क्वांटिको’च्या पहिल्या सत्रादरम्यान ‘बाजीराव मस्तानी’ची शूटिंग करीत होती. त्यामुळे त्यावेळी एलेक्सवर प्रियंकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत असल्याचे मला स्पष्टपणे जाणवत होते.’प्रियंकाने म्हटले की, ‘बºयाचदा शूटिंगदरम्यान असेही घडत होते की, मी एलेक्सचा संवाद भारतीय अंदाजात बोलत असे. तेव्हा माझे कोच माझ्याकडे आले अन् त्यांनी मला आठवण करून दिली की, एलेक्स एक अमेरिकन आहे. वास्तविक असे होण्यामागचे कारण असे की, जेव्हा मी भावुक किंवा रागात असते तेव्हा मी देसी बनते. तिच्या मते, मी जगाच्या कुठल्याही कोपºयात असले तरी मनाने पूर्णत: भारतीयच आहे. गेल्या काही महिन्यांपासून न्यू यॉर्क येथे राहणारी प्रियंका नुकतीच भारतात परतली आहे. तिच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात आलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा नुकताच आनंदोत्सव साजरा केला. यावेळी तिने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.