Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ -म्हणून अभिषेक बच्चनची हिरोईन बनण्यास प्रियांका चोप्राने दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:15 IST

साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर येणार, अशी  चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरु आहे. संजय ...

साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर येणार, अशी  चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरु आहे. संजय लीला भन्साळी हे बायोपिक घेऊन येणार असे कळतेय. या बायोपिकसाठी अमृता प्रीतमच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राचे नाव फायनल झाले होते. तर साहिर लुधियानवींच्या भूमिकेसाठी इरफान खान आणि शाहरूख खानचे नाव चर्चेत होते. पण मध्यंतरी इरफान व शाहरूख बाद झाले आणि अभिषेक बच्चनचे नाव पुढे आले. अभिषेक हाच साहिर लुधियानवींची भूमिका साकारणार, असे सांगितले जाऊ लागले. पण  अभिषेकचे नाव आले अन् पाठोपाठ प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याची बातमी आली.  अभिषेकचे नाव आल्याबरोबर प्रियांकाने भन्साळींना नकार का कळवला, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता याचे कारण समोर आले आहे.होय,‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने अभिषेकचे नाव आल्यावर हा चित्रपट सोडला यामागे एक मोठे कारण आहे. हे कारण आहे, ऐश्वर्या राय. होय, अभिषेकची बेटरहाफ ऐश्वर्या. आता ऐश्वर्या अन् प्रियांकाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण संबंध आहे. यापूर्वी रोहन सिप्पींच्या एका चित्रपटात ऐनवेळी ऐश्वर्याचा पत्ता कट होऊन प्रियांकाची वर्णी लागली होती. त्यावेळी प्रियांकासोबत काम करण्यास अभिषेकने नकार दिला होता. आता प्रियांकाने नेमके हेच करून वचपा काढल्याचे मानले जात आहे.ALSO READ : Trolled : ​प्रियांका चोप्रा, आता तुझ्या चेह-यावर वय दिसू लागलेयं...!चर्चेनुसार, प्रियांकाच्या नकारानंतर भन्साळींनी या चित्रपटासाठी  ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचा विचार चालवला आहे.   ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी या चित्रपटासाठी फायनल झालीच तर या जोडीचा हा एकत्र असा नववा चित्रपट असणार आहे. रमेश सिप्पी यांच्या २00३ मध्ये आलेल्या ‘कुछ ना कहो’ याचित्रपटात ऐश्वर्या व अभिषेक सर्वप्रथम एकत्र झळकले होते. यानंतर २०१० मध्ये आलेल्या मणी रत्नम यांच्या ‘रावन’ याचित्रपट दोघांनी एकत्र काम केले होते. संजय लीला भंसाळींसोबत ऐश्वर्याने याआधी ही काम केले आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ याचित्रपटांमध्ये ती दिसली होती.