Join us

​ कॅलेंडरवरील ‘त्या’ फोटोमुळे प्रियांका चोप्राने ओढवून घेतला नवा वाद! काँग्रेसची ‘प्रियांका हटाओ’ची मागणी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:51 IST

आज दिवसभर प्रियांका चोप्रा चर्चेत आहे. सकाळी सकाळी प्रियांका सुभाष घर्इंच्या ‘ऐतराज’च्या सीक्वलमधून बॉलिवूड वापसी करणार, अशी बातमी आली ...

आज दिवसभर प्रियांका चोप्रा चर्चेत आहे. सकाळी सकाळी प्रियांका सुभाष घर्इंच्या ‘ऐतराज’च्या सीक्वलमधून बॉलिवूड वापसी करणार, अशी बातमी आली अन् दुपारी आसामच्या पर्यटन विभागाच्या कॅलेंडरवरील फोटोमुळे प्रियांका वादात सापडली. होय,प्रियांकाशी संबंधित आणखी एक नवा वाद समोर आला आहे. प्रियांका आसामच्या टुरिज्म डेव्हलमेंट कार्पोरेशनची ब्रांड अ‍ॅम्बिसीडर आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. ब्रांड अ‍ॅम्बिसीडर या नात्याने प्रियांकाचा फोटो असलेले एक कॅलेंडर अलीकडे प्रकाशित करण्यात आले. पण याच कॅलेंडरवरील प्रियांकाच्या फोटोने वाद निर्माण केला. सोमवारी भाजपाशासीत आसामच्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सर्व आमदारांना हे सरकारी टेबल कॅलेंडर भेट देण्यात आले. पण हे कॅलेंडर पाहून काही आमदारांची माथी ठकणली. या कॅलेंडरच्या कव्हरपेजवर हलक्या भुºया रंगाचा फ्रॉक आणि डोक्यावर पारंपरिक आसामी ‘जापी’ असलेला प्रियांकाचा फोटो आहे.  ‘क्लीवेज’ दाखवणारा हा फोटो असभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारा आणि आसामच्या संस्कृतीला काळीमा फासणारा असल्याचे काँग्रेसच्या आमदारांनी म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर या अशा फोटोनंतर प्रियांकाला ब्रांड अ‍ॅम्बिसीडर पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पुढे रेटली आहे. प्रियांकाने या फोटोत फ्रॉक परिधान केलेला आहे. तिचा या पोशाखाचा आसामच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही. आसामात अनेक प्रतिभावान कलाकार असताना प्रियांकाला ब्रांड अ‍ॅम्बिसीडर बनवण्याची गरज काय, असा सवालही काँग्रेसने केला आहे.ALSO READ : ​‘ऐतराज’च्या सीक्वलमधून होणार प्रियांका चोप्राची बॉलिवूड ‘वापसी’!! अर्थात आसामच्या पर्यटन विभागाने काँगे्रस आमदारांचा हा आक्षेप खोडून काढत, संबंधित कॅलेंडर आसामला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. हे कॅलेंडर इंटरनॅशनल टूर आॅपरेटर्स आणि सेलिब्रिटींना पाठवण्यात आल्याचेही या विभागाने स्पष्ट केले आहे.याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाताना तोकडा ड्रेस घातल्यामुळे प्रियांका वादात सापडली होती. त्यावेळीही सोशल मीडियावर प्रियांकाला ट्रोल व्हावे लागले होते.