Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुझे हक है...! निकसोबतच्या साखरपुड्याच्या बातमीवर पहिल्यांदा बोलली प्रियांका चोप्रा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 11:19 IST

प्रियांका व निक कधी लग्न करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण प्रियांका मात्र साखरपुड्यापासून सगळेचं काही लपवण्याच्या मूडमध्ये आहे.

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. प्रियांका व निक कधी लग्न करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण प्रियांका मात्र साखरपुड्यापासून सगळेचं काही लपवण्याच्या मूडमध्ये आहे. काल दिल्लीच्या विमानतळावर उतरताच प्रियांका अगदी चालता चालता आपली एन्गेजमेंंट रिंग ‘छू मंतर’ करताना दिसली. निकचा सिंगापूरमधील लाईव्ह शो आटोपून काल प्रियांका दिल्लीला पोहोचली. यावेळी विमातनळावर उतरताच समोर मीडिया उभा असलेला पाहून तिने आपल्या बोटातील रिंग काढून चलाखीने जिन्सच्या खिशात घातली. अर्थात तिची ही चलाखी पकडली गेली. पण तिच्या या वागण्याने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. निकसोबत साखरपुडा झाला असेल तर प्रियांका ही बातमी जगापासून का लपवू पाहतेय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला.

 दिल्लीच्या इव्हेंटमध्ये प्रियांकाला हाच प्रश्न विचारला गेला. पण या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, ‘मुझे हक है’ सांगत प्रियांकाने वेगळाच सूर लावला. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी लोकांना ठाऊक आहेत. ९० टक्के गोष्टी लोकांना माहित आहेत. उरलेल्या १० टक्के गोष्टींवर मात्र केवळ माझा आणि माझा हक्क आहे. मी एक मुलगी आहे आणि काही गोष्टी स्वत:पर्यंतचं ठेवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर खुलासा देणे मी गरजेचा मानत नाही. या बातम्या वाचून कधीकधी मला हसायला येते. कधी कधी मी विचलितही होते. पण मग आजच्या बातम्या उद्या कचरा होणार, असे मनाला समजवतं मी पुढे जाते. मी कुठले कार्यालय उघडून बसलेले नाही. त्यामुळे मी कुणालाही बांधिल नाही, असे प्रियांका यावेळी म्हणाली.एकंदर काय तर निकबद्दल काहीही बोलायला प्रियांका सध्या तरी तयार नाही. तिचा मूड काही न्याराचं आहे. आता हा लपाछपीचा खेळ कुठपर्यंत चालतो, तेचं तेवढे बघायचे आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास