Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रियांका चोप्रा नाही, डॉक्टर प्रियांका चोप्रा म्हणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 10:19 IST

प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. नवे वर्षे कुटुंबीयांसोबत साजरे करण्यासाठी प्रियांका भारतात आली आहे. प्रियांकाने विदेशात यशाचे झंडे गाडलेयं. ...

प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. नवे वर्षे कुटुंबीयांसोबत साजरे करण्यासाठी प्रियांका भारतात आली आहे. प्रियांकाने विदेशात यशाचे झंडे गाडलेयं. इथे मुंबईतही प्रियांका असे काही करतेयं की, ज्याची दुसरी कुणी अभिनेत्री कल्पनाही करू शकत नाही. अलीकडे एका इव्हेंटमध्ये प्रियांकाला ग्लोबल आयकॉन अवार्डने सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्रियांकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला जाणार आहे.  होय, आता प्रियांकाच्या नावापुढे ‘डॉक्टर’ लागणार आहे.  ‘मानद डॉक्टरेट’ देऊन प्रियांकाला सन्मानित करण्याचा निर्णय बरेली विद्यापीठाने घेतला आहे. अनेक सामाजिक कार्यातील योगदानासाठी प्रियांकाला या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. आज रविवारी आयोजित सोहळ्यात प्रियांकाला हा गौरव प्रदान करण्यात येईल.
सध्या प्रियांका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. ‘जय गंगाजल’नंतर तिने एकही बॉलिवूड चित्रपट साईन केलेला नाही. यावर्षीच्या सुरुवातीला प्रियांका  ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात एका निगेटीव्ह भूमिकेत दिसली होती. लवकरच प्रियांकाचे आणखी दोन हॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत. बरेली हे प्रियांकाचे मूळ गाव. येथील किला ओव्हर ब्रिजजवळ आजही प्रियांकाच्या पूर्वजांचे घर आहे. सध्या प्रियांका ‘क्वांटिको3’ या अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये बिझी आहे.

ALSO READ : देसी गर्ल प्रियंका चोपडाने लग्न केव्हा करणार असे विचारताच दिले ‘हे’ उत्तर!

अलीकडे प्रियांका ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ म्हणून निवडली गेली. गतवर्षी प्रियांकाला पछाडत दीपिका पादुकोण हिने  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत पहिले स्थान मिळवले होते. पण यंदा  दीपिकाला धक्का देत प्रियांकाने पुन्हा एकदा या स्थानावर कब्जा मिळवला आहे.   लंडन येथील  इस्टर्न आय  या मॅगझिनने ५० ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली आहे. या यादीत  प्रियांकाने अग्रस्थान पटकावले आहे. तर दीपिकाचे नाव पहिल्या स्थानावरून चक्क तिसºया स्थानावर घसरले आहे.