Join us

प्रियांका चोप्रा झाली या गोष्टीमुळे इन्स्टाग्रामवर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 16:11 IST

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. नुकतेच प्रियांकाने तिचा पाऊट करतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर ...

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. नुकतेच प्रियांकाने तिचा पाऊट करतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला होता. ये फोटोखाली तिने गर्मियों से प्यार असे कॅप्शन लिहिले आहे. तिच्या या फोटोमुळे प्रियांकाला इन्स्टागाम्रवर ट्रॉल करण्यात आले आहे. लोकांनी तिला ओठांची सर्जरी केली. अनेक लोकांनी तर दावा केला आहे.तिने ओठ मोठे करण्यासाठी सर्जरी केली आहे. कदाचित प्रियांकाला हा फोटो शेअर करताना या गोष्टीची कल्पना नाही की या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात येईल. बेकार प्लॉस्टिक चेहरा, क्या आपने लिप सर्जरी करावाई है, मछली की तरह लग रही हो अशा पद्धतीच्या कमेंट्स तिच्या फोटोला करण्यात आल्या आहेत.   गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा अनेक वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीच्या वेळी प्रियांका परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर टीकेची झोड उठली होती. प्रियांका मोदींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिला ट्रोल करण्यात आले होते. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. बेवॉचनंतर आणखीन एक हॉलिवूडपटात  प्रियांका दिसणार आहे. तसेच ती क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनमध्ये ही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर तिने मी लग्न करणार, हे नक्की आहे. पण मी माझ्या कामावर सर्वाधिक प्रेम करते. माझ्या कामाची पद्धत आणि कमिटमेंट हँडल करणे, प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. त्यामुळे माझा लाईफ पार्टनर यादृष्टीने मला समजून घेणारा आणि मला पाठींबा देणारा असावा, असे मला वाटते