Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या किती श्रीमंत आहे प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड, एका शो साठी घेतो तब्बल इतके लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 10:46 IST

प्रियांकाचा प्रियकर निक हा प्रियांकापेक्षा देखील प्रसिद्ध असून तो प्रचंड श्रीमंत आहे. प्रियांकाकडे असलेली मालमत्ता आणि निककडे असलेली मालमत्ता यांच्यात कित्येक कोटींचा फरक आहे.

प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी येथे आल्यानंतर त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रियांकाचा प्रियकर निक हा प्रियांकापेक्षा देखील प्रसिद्ध असून तो प्रचंड श्रीमंत आहे.निक जोनास हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती असून त्याचे आजवरचे अनेक अल्बम फेमस झालेले आहेत. प्रियांकापेक्षा निक कित्येक पटीने श्रीमंत असल्याचे सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटने म्हटले आहे. त्यांच्या बातमीनुसार निक जोनास एका शो साठी 50 हजारांपासून ते एक लाख डॉलरच्या घरात आहे. म्हणजेच तो केवळ एका शोसाठी 35 लाखांपासून ते 70 लाखांपर्यंत मानधन घेतो. तसेच प्रियांकाची संपत्ती 16 मिलियन डॉलर म्हणजेच 110 कोटी रुपये आहे तर निक जोनासची मालमत्ता 25 मिलियन डॉलर म्हणजेच 172 कोटी रुपये आहे.प्रियांकाकडे असलेली मालमत्ता आणि निककडे असलेली मालमत्ता यांच्यात कित्येक कोटींचा फरक आहे. प्रियांकाजवळ मुंबई आणि पुण्यात रिअल इस्टेट प्रॉपर्टी असून त्याची किंमत 55 कोटी इतकी आहे तर निक जोनासकडे लॉस एंजिलिसमध्ये आणि हॅम्पटन येथे अलिशान बंगला आहे.निक केवळ एका शो साठी लाखोच्या घरात रुपये घेतो तर प्रियांकाला तिच्या एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मिळतात. तसेच ती जाहिरातींसाठी तीन ते पाच कोटी घेते. प्रियांका आणि निक दोघे सुमारे आठवडाभर भारतात होते. खास प्रियांकाच्या आईला, कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. भारतात निक, प्रियांका अगदी बिनधास्त एकत्र फिरले, हातात हात घालून पार्ट्यांना पोहोचले. यानंतर गेल्या गुुरूवारी रात्री प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास