आणखीन एक महिला खेळाडूच्या बायोपिकमध्ये झळकणार प्रियांका चोप्रा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 13:52 IST
जर तुम्ही प्रियांका चोप्राचा मेरी कॉम चित्रपट आवडला असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. तुम्हाला प्रियांका पुन्हा एकदा ...
आणखीन एक महिला खेळाडूच्या बायोपिकमध्ये झळकणार प्रियांका चोप्रा ?
जर तुम्ही प्रियांका चोप्राचा मेरी कॉम चित्रपट आवडला असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. तुम्हाला प्रियांका पुन्हा एकदा एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. या वेळी प्रियांका पडद्यावर अशा एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. जिचा देशाला नेहमीच अभिमान राहिला आहे. आम्ही बोलतो आहे ते ऑलिम्पिंक चॅम्पियन पी.टी. उषाबाबत. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलात प्रियांका चोप्रा पी.टी. उषा यांची भूमिका साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांकासोबत या चित्रपटासंदर्भात बोलणं सुरु देखील झाले आहे. ऐवढेच नाही तर या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान देणार आहे. चित्रपटाचा बजेट कमीत कमी 100 कोटी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवती एस वर्मा. रेवतीने तमिळ आणि मल्याळम मधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच रेवती आणि पी.टी.उषा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. पी.टी. उषाबाबत अनेक गोष्टी रेवतीला माहिती आहे त्यामुळे चित्रपट तयार करताना तिला फारशी अडचण येणार नाही. हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, चायनीज आणि रशियन सारख्या अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. मात्र प्रियांता चोप्रा आणि ए. आर. रहमान कडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ALSO READ : प्रियांका चोप्रा बनली जगातील ८ व्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री!पाच वेळा विश्वकप चॅम्पियन बनलेल्या मेरी कॉमची भूमिका प्रियांका चोप्राने मोठ्या पडद्यावर अतिशय सशक्त पणे साकारली होती. याचित्रपटासाठी तिला अनेकवेळा अॅवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आले. ऐवढेच नाही तर प्रियांका यापुढे ही ती आणखीन एक दुसऱ्या दिग्गज महिला खेळाडूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करणार आहे. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे नाव जगातील सर्वाधिक कमाई करणारी आठव्या क्रमांकाची टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत आले होते. प्रियांका शेवटची बाजीराव मस्तानी चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती थेट हॉलिवू़डमध्ये बिझी झाली. प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दिसणार हे ऐकून तिचे चाहते नक्कीच खूष झाले असतील मात्र हा चित्रपट फ्लोअरवर यायला किती वेळ लागले याबाबत अजून काही सांगू शकत नाही.