Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या लग्नाला सप्टेंबरचा मुहूर्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 10:28 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सलमान खानच्या ‘भारत’मधून ऐनवेळी अंग काढून घेतले आणि प्रियांका लवकरच लग्न करणार, या चर्चेला जोर चढला. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सलमान खानच्या ‘भारत’मधून ऐनवेळी अंग काढून घेतले आणि प्रियांका लवकरच लग्न करणार, या चर्चेला जोर चढला. यातचं प्रियांका व तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त आले. गत १८ जुलैला प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी निकने तिला प्रपोज केल्याचे या वृत्तात म्हटले गेले. आता प्रियांका व निकच्या लग्नाबद्दल ताजी माहिती समोर येतेय. होय, प्रियांका व निक येत्या सप्टेंबर महिन्यात लग्न करू शकतात, असे कळतेय. येत्या १६ सप्टेंबरला निक २६ वर्षांचा होतोय. याच दिवशी या कपलचा डबल सेलिब्रेशनचा प्लान असल्याचे कळतेय. अद्याप प्रियांका वा निक या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी सुरू झालीयं, इतपत चर्चा आहे. आता खरे काय नि खोटे काय, हे प्रियांका व निक या दोघांनाचं ठाऊक. पण दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेयं, इतके मात्र नक्की.

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निकशी प्रियांकाचे नाव जोडले जात आहे. प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.  प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली होती.  अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडली नाही. काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या आई व कुटुंबाला भेटण्यासाठी निक भारतात आला होता. भारतातील मुक्काम संपवून निक व प्रियांका अमेरिकेत रवाना झाले आणि येथून पुढे ब्राझिलला पोहोचले. ब्राझिलमध्ये निकचे लाईव्ह कॉन्सर्ट होते. येथे प्रियांकाही त्याच्यासोबत होती.

२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा