दरम्यान, प्रियंकाने या सर्व प्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर केला असून, तो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ती खूपच त्रस्त असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ती हे सांगत आहे की, गेल्या तीन तासांपासून मी आणि माझी फॅमिली मुंबई विमानतळावर फ्लाइटची प्रतीक्षा करीत आहे. आम्हाला बरेली येथे जायचे आहे. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही की, आम्ही बरेलीला पोहोचणार की नाही?
व्हिडीओमध्ये ती तिच्या चाहत्यांसाठी एक पोलही चालविताना दिसत आहे. ज्यामध्ये तिने विचारले की, ‘मी बरेलीला पोहोचणार की नाही, येस किंवा नोमध्ये उत्तर द्या!’ प्रियंकाला तिच्या होमटाउन बरेली येथे डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित करण्यात आले. याचसंदर्भात ती बरेलीला जात होती. बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती केशव कुमार अग्रवाल यांनी तिला ही डिग्री देऊन सन्मानित केले. दरम्यान, प्रियंका तब्बल पाच वर्षांनंतर तिच्या होमटाउनला जात होती. तिचे लहानपण उत्तर प्रदेशातील बरेली येथेच गेले.
दरम्यान, प्रियंका युनिसेफची गुडविल अॅम्बेसेडर असून, तिने याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रियंका लवकरच A Kid Like Jake आणि Isn't It Romantic? या दोन हॉलिवूडपटांमध्ये झळकणार आहे.