प्रियांका बनली आसाम टुरिझमची ब्रँड अॅम्बेसेडर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:43 IST
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे बॉलिवूडमधील योगदान पाहून आसाम सरकारने तिची पर्यटन विभागाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ...
प्रियांका बनली आसाम टुरिझमची ब्रँड अॅम्बेसेडर !
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे बॉलिवूडमधील योगदान पाहून आसाम सरकारने तिची पर्यटन विभागाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आसामचे अर्थ आणि पर्यटनमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सोमवारी प्रियांकाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. येत्या २४ डिसेंबरला प्रियांका गुवाहाटीला भेट देणार आहे. यावेळी प्रियांकाच्या नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे शर्मा सांगितले की,आम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडे ब्रँड अॅम्बेसेडरचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. पण, त्याने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर ४-५ सेलिब्रिटींकडे आम्ही गेलो. मात्र आम्हाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही प्रियांका हिलाच आमची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही प्रियांका चोप्राला आसामची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तिची निवड फ्री आॅफ कॉस्ट निवड करण्यात आलीय. या प्रस्तावाविषयी अधिक माहिती देताना शर्मा म्हणाले, या प्रोजेक्टअंतर्गत होणारे शूटिंग आणि प्रिंट जाहीराती यांच्यासाठी केवळ खर्च करण्यात येईल. इतर कुठलाच खर्च यात होणार नाही. पीसी २४ डिसेंबरला गुवाहाटी येथे येणार असून इंटरनॅशनल टूर आॅपरेटर्स कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहे. पीसीसोबत आम्हीही यूएस, यूके, जपान आणि जर्मनी येथे प्रोमोशनल अॅक्टिव्हिटींसाठी जाणार आहोत. आसाम टुरिझमकडे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढावा या उद्देशाने प्रियांकाला ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. तिच्या माध्यमातून आसाम राज्याचे सौंदर्य संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.