Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘ट्यूबलाईट’ला सुद्धा प्रीतम यांचेच संगीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 21:19 IST

संगीतकार प्रीतम चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाईल आणि आपल्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक हिट गाणी दिली ...

संगीतकार प्रीतम चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाईल आणि आपल्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ला संगीत देणारेही प्रीतम. खरे तर ‘बजरंगी भाईजान’साठी संगीत देणे प्रीतम यांच्यासाठी एक आव्हान होते. पण हे आव्हान प्रीतमदांनी यशस्वीपणे पेलले आणि ‘बजरंगी भाईजान’ने यशाचे सगळे रेकॉर्ड तोडले. हेच प्रीतमदा आता कबीर खान व सलमानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटालाही संगीत देणार आहेत. म्हणजेच ‘बजरंगी भाईजान’ची कबीर,सलमान, प्रीतम ही हिट जोडी ‘ट्यूबलाईट’मध्ये पुन्हा एकत्र येणार आहे. तेव्हा पैसा वसूल होणार हे सांगणे नकोच... .