प्राचीला करायचेय बायोपिक्समध्ये काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:21 IST
मोहम्मद अझहरूद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ चित्रपटात प्राची देसाईने त्याची पत्नी नौरीनची भूमिका केली आहे. त्यामुळे आता तिला स्वत:च्या ...
प्राचीला करायचेय बायोपिक्समध्ये काम!
मोहम्मद अझहरूद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ चित्रपटात प्राची देसाईने त्याची पत्नी नौरीनची भूमिका केली आहे. त्यामुळे आता तिला स्वत:च्या अभिनयावर आधारित बायोपिकमध्ये काम करावयाचे आहे. तिचे म्हणणे आहे की, कल्पना चावला आणि कै.महाराणी गायत्री देवी हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करायला आवडेल.प्राचीने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव ती तिची शिदोरी समजते. तिला सध्यातरी या दोन व्यक्तींवर आधारित बायोपिकमध्ये काम करायचे आहे.तिचा आगामी चित्रपट ‘रॉक आॅन २’ मध्येही तिला श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, पूरब कोहली आणि अर्जुन रामपालसोबत काम करायला मिळाले.