Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण अगोदर अहाना देओलच्या प्रेमात होता रणवीर सिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:07 IST

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना. ईशा सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तर अहाना ...

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना. ईशा सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तर अहाना देओल लग्न करून सेटल झाली आहे. आज अहानाचा ३२ वा वाढदिवस असून, ईशा बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यास कुठलीच कसर सोडत नसल्याचे दिसत आहे. वास्तविक अहानाचा इंडस्ट्रीशी फार संबंध राहिला नाही; मात्र अशातही तिने बॉलिवूडमधील अनेक स्टार्सला डेट केले आहे. यामधील एक नाव म्हणजे रणवीर सिंग हे होय. रणवीरचे गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणशी नुकतेच ब्रेकअप झाले आहे; मात्र दीपिकाअगोदर तो अहानाच्या प्रेमात होता.  

रणवीर आणि अहाना एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात. त्यावेळी रणवीर अहानावर प्रचंड प्रेम करीत होता; मात्र त्यांच्यातील हे प्रेमसंबंध फार काळ टिकले नाही. रणवीर शिक्षणानिमित्त बरेच वर्ष विदेशात राहिल्याने, अहानाने त्याच्याशी ब्रेकअप केले. त्यानंतर त्याचे नाव अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांच्याशी जोडले गेले. तर अहानानेदेखील रणवीरशी ब्रेकअप केल्यानंतर आदित्य रॉय-कपूर याच्याशी नाते जोडले. परंतु आदित्यसोबतचेही तिचे नाते फार काळ टिकले नाही. पुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये अहानाने उद्योगपती वैभव वोहरा यांच्याशी लग्न केले.  



वास्तविक वैभवबरोबर अहाना चार वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नात अहानाचे सावत्र भाऊ बॉबी देओल आणि सनी देओल उपस्थित नव्हते; मात्र चुलत भाऊ अभय देओल याने लग्नात हजेरी लावली होती. अभय अहानाच्या खूप क्लोज आहे, त्यामुळेच त्याने लग्नात हजेरी लावली होती. पुढे लग्नाच्या एक वर्षातच तिला पहिला मुलगा झाला. सध्या ती आपल्या परिवारासह मुंबईत सेटल आहे. 

अहाना भलेही चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली नसली तरी, ती बहीण ईशा आणि आई हेमाप्रमाणे ट्रेण्ड क्लासिकल डान्सर आहे. सध्या ती तिच्या परिवारात सुखी आहे. दरम्यान, बहीण ईशा गर्भवती असल्याने तिची काळजी घेण्याची जबाबदारी अहानाने स्वीकारली आहे. अहाना ईशाला बºयाचशा टिप्स देत असून, ईशा त्याचे पालन करीत आहे.