अदनान सामीच्या परिवाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 20:51 IST
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या परिवाराने शनिवारी (दि.९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्याची पत्नी रोया ...
अदनान सामीच्या परिवाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या परिवाराने शनिवारी (दि.९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्याची पत्नी रोया सामी-खान आणि मुलगी मदिना उपस्थित होती. याबाबतची माहिती स्वत: अदनानने ट्विटरवर एक फोटो शेअर करून दिली. फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अदनानची चिमुकली मदिना हिचा प्रेमाने गाल ओढताना दिसत आहेत. अदनानने हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘प्रिय सम्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि मुलगी मदिनाला दिलेल्या आशीर्वादासाठी मन:पूवर्क धन्यवाद!’अदनान नेहमीच त्याच्या चिमुकलीचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अदनानच्या या चिमुकलीचा जन्म ९ मे २०१७ रोजी झाला. अदनाने त्याच्या मुलीच्या जन्माप्रसंगी म्हटले होते की, मदिना आमच्यासाठी सर्वा अतुल्य आहे. मला आणि रोयाला सुरुवातीपासूनच मुलगी हवी होती. ती आमची ‘लकी चार्म’ आहे.’ अदनानने त्याच्या मुलीच्या जन्माप्रसंगी हेदेखील म्हटले होते की, ‘मला तिच्यामुळेच संगीतामध्ये नवी प्रेरणा मिळाली आहे. ती माझ्या आयुष्याचा केंद्र आहे.’ अदनानने २६ मे २०१५ रोजी भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. दरम्यान, अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले असून, त्याला ओळखणेही अवघड होते.