Join us

Press Conference On success Of Jolly LLB 2

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:31 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा जॉली एलएलबी-2 ची सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईतल्या एका ठिकाणी पार पडली. अक्षय कुमारचा चित्रपट रिलीजनंतर काही दिवसात 100 कोटीच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी चित्रपटाने 2 कोटी 45 लाखांचा गल्ला जमावला आणि 100 कोटी 37 लाखांचा आकाडा पार केला.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा जॉली एलएलबी-2 ची सक्सेस पार्टी नुकतीच मुंबईतल्या एका ठिकाणी पार पडली. अक्षय कुमारचा चित्रपट रिलीजनंतर काही दिवसात 100 कोटीच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी चित्रपटाने 2 कोटी 45 लाखांचा गल्ला जमावला आणि 100 कोटी 37 लाखांचा आकाडा पार केला. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीच्या ठिकाणी येताना अक्षय कुमार भलताच खूश दिसला.यावेळी अक्षयने प्रसारमाध्यमांशी ही संवाद साधला.यावेळी अक्षयसह एलएलबी-2 टीम ही उपस्थित होती.यावेळी अक्षयने जॉली एलएलबी2 मध्ये शूटिंगसाठी वापरलेली स्कूटर सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्याला दिली.याच स्कूटरवरुन अक्षय कुमार जॉली एलएलबी2 मध्ये आपल्याला अक्षय कुमार फिरताना दिसला आहे.