मागील वर्षी करीना कपूर (Kareena Kapoor), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांच्या 'क्रू' (Crew) चित्रपटाने थिएटरमध्ये बंपर कमाई केली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेला खूप पसंती दिली होती. बऱ्याच काळापासून चाहते या चित्रपटाच्या पुढील भागाची मागणी करत होते आणि आता निर्मात्यांनी अखेर चाहत्यांची ही मागणी ऐकली असून 'क्रू २'ची तयारी सुरू केल्याचं समजते आहे.
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रू' चित्रपटातील करीना कपूर, क्रिती सनॉन आणि तब्बू या तिघींना लोकांनी खूप प्रेम दिले. इतकेच नाही तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती. चाहत्यांच्या सततच्या मागणीमुळे आता निर्माते याच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहेत. एकता कपूर आणि रिया कपूर यांच्या या चित्रपटासाठी करीना कपूरचा रोल जवळपास निश्चित झाला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'क्रू' फ्रँचायझीचा सीक्वल येण्याची पूर्ण शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चित्रपट निर्माते बऱ्याच काळापासून पुढील भागाच्या कथेवर चर्चा करत होते आणि आता त्यांनी 'क्रू २' ची कथा फायनल केली आहे.
क्रिती आणि तब्बूचा 'क्रू २' मधून पत्ता कट?रिपोर्ट्सनुसार, एकता कपूर आणि रिया कपूर यांच्या 'क्रू २' मध्ये काम करण्यासाठी करीना कपूरने आपली संमती दिली आहे. मात्र, चित्रपटातील इतर स्टारकास्टबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी ओरिजिनल स्टारकास्ट असावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने या वेळी तीन ए लिस्ट अभिनेत्रींना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली अभिनेत्री करीना कपूर आहे, पण इतर दोन अभिनेत्री कोण असतील, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
करीनाने 'क्रू २'साठी होकार दिलाय, पण... करीना कपूरबद्दल बोलायचं झाल्यास, तिने सध्या या फ्रँचायझीचा भाग होण्यासाठी होकार दिला आहे, पण तिने अद्याप चित्रपट साइन केलेला नाही. ती स्क्रीनप्लेची वाट पाहत आहे आणि संपूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतरच ती तिचा अंतिम निर्णय घेणार आहे.
Web Summary : Following the success of 'Crew,' producers are planning a sequel. Kareena Kapoor is likely to return, but the rest of the cast is yet to be confirmed. The script is being finalized.
Web Summary : 'क्रू' की सफलता के बाद, निर्माता सीक्वल की योजना बना रहे हैं। करीना कपूर की वापसी की संभावना है, लेकिन बाकी कलाकारों की पुष्टि होनी बाकी है। स्क्रिप्ट को अंतिम रूप दिया जा रहा है।