बॉलिवूडचे दोन दिग्गज गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने चाहत्यांना चिंता सतावत होती. अभिनेते धर्मेंद्र यांच्यानंतर दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयाशी संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता प्रेम चोप्रा यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.
मीडिया रिपोर्ट आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम चोप्रा यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र त्यांची प्रकृती कधीही गंभीर नव्हती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना आधीपासूनच हृदयासंबधित त्रास होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
प्रेम चोप्रा यांचे जावई विकास भल्ला यांनी सांगितलं होतं की, त्यांचे सासरे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. या संदर्भात माहिती देताना विकास भल्ला पुढे म्हणाले होते, "या सर्व वयाशी संबंधित गुंतागुंती आहेत आणि एक नियमित चेकअप आहे. यात काळजी करण्यासारखे काहीही नाही." हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक, प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Web Summary : Veteran actor Prem Chopra was hospitalized due to a lung infection causing breathing difficulties. He had pre-existing heart issues. Doctors discharged him, reporting his condition as stable and improved. He's acted in over 380 films.
Web Summary : अभिनेता प्रेम चोपड़ा फेफड़ों में संक्रमण के कारण अस्पताल में भर्ती थे, जिससे सांस लेने में तकलीफ हो रही थी। उन्हें पहले से ही हृदय संबंधी समस्या थी। डॉक्टरों ने उन्हें स्थिर हालत में छुट्टी दे दी। उन्होंने 380 से अधिक फिल्मों में काम किया है।