प्रियंकाने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:56 IST
प्रियंका चोपडाच्या ‘मॅक्झिम’ नावाच्या मॅगझीनवरील कव्हर फोटो वरून होत असलेल्या टीकेला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
प्रियंकाने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर
‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाच्या ‘मॅक्झिम’ नावाच्या मॅगझीनवरील कव्हर फोटो वरून होत असलेल्या टीकेला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.या कव्हर फोटोमध्ये फोटोशॉपद्वारे इफेक्ट्स देऊन प्रियंकाचे सौंदर्य आणि खासकरून अंडरआर्म्स मुलायम करण्यात आल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.परंतु ‘राईचा पर्वत’ करण्याची नेटीझन्सला सवयच आहे. परंतु प्रियंकाने इन्स्टाग्रामवर तिचे अंडरआर्म्स स्पष्ट दिसतील असा फोटो शेअर केला आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर देत कॅप्शन दिले की, ‘विनाकारण सुरू असलेल्या चर्चेला आणखी एक मुद्दा.’आतापर्यंत या फोटोला दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या असून मुलींचे सौंदर्य नेमके काय यावर वादविवाद सुरू झाले आहेत.