Join us  

बाबो ! 'या' अभिनेत्रीने कोरोनाची घेतलीय धास्ती,आत्तापर्यंत तब्बल २० वेळा केलीय चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 4:18 PM

प्रीती झिंटा व्हिडीओ शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे, यात तिने स्वतःविषयी ''कोरोना टेस्ट क्वीन बनली आहे''असे म्हटले आहे.

कोरोना विषाणूची लागण होवू नये म्हणून प्रत्येकजण आपपल्या परीने  खबरदारी घेतोय. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सा-यांनाच कोरोनाने धडकी भरवली आहे. अशात अभिनेत्री प्रीती झिंटाला देखील कोरोनाची धास्ती घेतलीय की काय असेही तुम्हाला वाटेल.नुकतेच प्रीतीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे, यात तिने स्वतःविषयी ''कोरोना टेस्ट क्वीन बनली आहे''.असे म्हटले आहे. याला कारणही तसेच आहे. कारण आत्तापर्यंत प्रीतीने एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल २० वेळा कोरोनाची टेस्ट केली आहे. प्रत्येकवेळी तिची टेस्टही निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे कोरोनापासून अजूनतरी प्रीती सुरक्षित आहे. सध्या 'किंग्ज इलेव्हन पंजाब' टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रीती युएईमध्ये आहे. आएपीएलमध्येही ती बिझी आहे.

कोरोनापासून स्वतःचा बचाव करत असल्याबाबत सांगताना म्हणाली की, “प्रत्येकजण मला विचारतो की, बायो बबलमध्ये राहण्याचा कसा अनुभव आहे.

तर याची सुरूवात क्वॉरंटाईनपासून होते ६ दिवस तुम्ही अलगीकरणात राहतात. तसेच कोविड चाचणी दर दोन ते तीन दिवसानंतर करणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवसांत तुम्हाला बाहेर जाण्याचीही मुभा नसते. त्यामुळे आम्ही  बाहेर पडत नाही, फक्त आमची खोली, किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी असेलेल  रेस्टॉरंट, जिम आणि स्टेडियम या व्यतिरिक्त कुठेही जाण्यास परवानगी नसते. 

ड्राइवर पासून ते शेफपर्यंत सगळेच बायो बबलमध्येच राहतात. म्हणून बाहेरून अन्न नाही, लोकांशी कोणताही संवाद नाही. जर आपण माझ्यासारखेच मोकळ फिरणारे असाल तर या सगळ्या गोष्टींचे पालन करणे थोडे अवघडच जाते. शेवटी आयपीएलचे महामारीच्या दरम्यान आयोजन झाल्याचा आनंदच खूप आहे. त्यामुळे सर्व काही मॅनेज होत असल्याचे तिने म्हटले आहे. 

प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

आज प्रीती बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रीतीला अनेक संघषार्चा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही. अ‍ॅक्टिंग व बिझनेस याशिवाय प्रीती बीबीसीसाठी लिखाणही करायची. एकदा 600 कोटी रूपयांची संपत्ती मिळवण्याची संधी प्रीतीपुढे चालून आली होती. पण प्रीतीने ही संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. होय, प्रीती ही शानदार अमरोहींची दत्तक मुलगी असल्याचे म्हटले जाते. शानदार अमरोही यांच्या निधनानंतर त्यांची 600 कोटींची संपत्ती प्रीतीच्या नावावर होणार होती. कमाल अमरोही यांच्या अमरोही स्टुडिओच्या वादात प्रीतीने शानदार अमरोहींची बाजू घेतली होती. त्यामुळेच 600 कोटींची संपत्ती प्रीतीच्या नावावर करण्याचा निर्णय शानदार अमरोहींनी घेतला होता. मात्र, प्रीतीने ही संपत्ती स्वीकारली नाही.

टॅग्स :प्रीती झिंटाकोरोना वायरस बातम्या