Join us

बेबो करतेय ‘प्रेगनंन्सी ट्रेंड’ सेट- सोहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 11:36 IST

सोहा अली खान म्हणते,‘करिना कपूर खान ही खऱ्या अर्थाने ‘ट्रेंडसेटर’ आहे. तिची फॅशन, तिची स्टाईल आणि तिचे चित्रपट यातून ती ...

सोहा अली खान म्हणते,‘करिना कपूर खान ही खऱ्या अर्थाने ‘ट्रेंडसेटर’ आहे. तिची फॅशन, तिची स्टाईल आणि तिचे चित्रपट यातून ती स्वत:चे वेगळेपण आणि फॅशन नेहमी सेट करत असते.सध्या ती प्रेगनंन्ट असूनही वेगवेगळ्या तिच्या फॅशन्स ती मार्केटमध्ये रूजवत आहे. आत्तापर्यंत कोणत्या अभिनेत्रीने यापूर्वी असे फॅशन ट्रेंड्स सेट केले नव्हते. फॅशन वीक रॅम्पवरही ती गेल्या महिन्यात मोठ्या दिमाखात वावरली होती.तिच्या मते, प्रेगनंन्सीमुळे  करिअरमधील संधी कमी होतात असे होत नाही, तर नंतरही करिअर करता येऊ शकते. मी तिच्यासाठी खुप आनंदी आहे. ती पहिल्यांदाच आई होणार आहे. आणि ती त्यामुळे खुप सुंदर दिसत आहे.’