Join us

​ प्रकाश झा यांना अ‍ॅक्टिंगचा ‘चस्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 09:16 IST

गत तीन दशकांपासून दिग्दर्शनाच्या क्षेत्र गाजवणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी स्वत:च दिग्दर्शित केलेल्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटातून अभियन क्षेत्रात ...

गत तीन दशकांपासून दिग्दर्शनाच्या क्षेत्र गाजवणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी स्वत:च दिग्दर्शित केलेल्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटातून अभियन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या चित्रपटात झा एका भ्रष्ट पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहेत. पण आताश: प्रकाश यांना अ‍ॅक्टिंग भारी वाटू लागली आहे. मी यापुढेही अभिनय सुरु ठेवेल, असे त्यांनी जाहिर करून टाकले.  ‘जय गंगाजल’मधील भूमिका मला आवडली होती, म्हणून मी ती केली.  तोडीस तोड अशी भूमिका मिळालीच तर मी पुढेही अभिनय करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात हा अभिनय स्वत:च्याच चित्रपटात करणार की अन्य दिग्दर्शकांचेही प्रस्ताव स्वीकारणार, हे मात्र झा यांनी स्पष्ट केलेले नाही.अलीकडे तिग्मांशु धूलिया, अनुराग कश्यप, करण जौहर यासारखे अनेक दिग्दर्शक पडद्यावर अभिनय करताना दिसले. झा हेही या पंक्तित जावून बसले आहेत. त्यांची अभिनयाची कारकिर्द किती फुलते आणि फळते, ते बघूयात!