प्रभासच्या ‘साहो’मध्ये दिसणार स्वातंत्र्यापूर्वीची कथा! वाचा, आणखी तपशील!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 12:26 IST
‘बाहुबली2’नंतर प्रभासच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रभासच्या ‘साहो’कडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. ‘साहो’मध्ये प्रभासचा लूक कसा ...
प्रभासच्या ‘साहो’मध्ये दिसणार स्वातंत्र्यापूर्वीची कथा! वाचा, आणखी तपशील!!
‘बाहुबली2’नंतर प्रभासच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रभासच्या ‘साहो’कडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. ‘साहो’मध्ये प्रभासचा लूक कसा असणार? ‘साहो’ची नेमकी कथा काय? त्याची भूमिका कशी असणार? त्याच्यासोबत कुठली अभिनेत्री दिसणार? असे एक ना अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे सध्या तरी आमच्याकडे नाहीत. पण एका प्रश्नाचे उत्तर मात्र आमच्याकडे नक्की आहे. होय, ‘साहो’ची कथा नेमकी काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शिवाय या चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण सीन्सबद्दलही माहिती देणार आहोत.सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’ हा स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. सध्या रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यासाठी स्वातंत्र्यापूर्वीचा सेट उभारण्यात आला आहे.ALSO READ : अनुष्का शेट्टीचे वजन होईना कमी! प्रभासच्या ‘साहो’मधून झाली ‘छुट्टी’!! ‘साहो’चा तामिळ व हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव अद्याप फायनल झालेले नाही. आधी यात प्रभासच्या अपोझिट अनुष्का शेट्टी दिसणार, अशी चर्चा होती. पण वाढलेल्या वजनामुळे अनुष्का शेट्टीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे आता प्रभाससाठी नव्या अभिनेत्रीचा शोध घेणे सुरु झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी तूर्तास श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा सुरु आहे.