Join us
Daily Top 2Weekly Top 5

Love In Air : आपल्या लेडी लव्हसाठी प्रभासने ठेवले साहोचे स्पेशल स्क्रिनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 15:35 IST

प्रभास त्याच्या प्रोफेशन लाईफला घेऊन चर्चेत असतो तेवढाच त्याच्या पर्सनल लाईफला देऊन असतो. प्रभास आणि त्याची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. गेल्या

जेवढा प्रभास त्याच्या प्रोफेशन लाईफला घेऊन चर्चेत असतो तेवढाच त्याच्या पर्सनल लाईफला देऊन असतो. प्रभास आणि त्याची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का शेट्टीसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन प्रभास लाईमलाईटमध्ये आहे. मध्यतंरी त्याच्या लग्नाच्या चर्चेने जोर पकडला होता. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रभासने अनुष्कासाठी साहोचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले आहे. ते कधी, कुठे, कसं याबाबतची काही माहिती नाही. या स्पेशल स्क्रिनिंगबाबत प्रभासने स्वत: काही खुलासा केला नाही.  रिपोर्टनुसार, प्रभास अनुष्कासाठी साहोच्या स्पेशल स्क्रिनिंगची तयारी करतोय.  

प्रभास आणि अनुष्का एकमेकांना बघितल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. शूटिंगदरम्यान, हे दोघे एकमेकांशी तासनतास व्हिडीओ चॅट करीत असल्याचे समजते.  २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि प्रभासने एकत्र काम केले होते. प्रभासने अनुष्काला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. 

प्रभासच्या साहोबाबत बोलायचे झाले तर यात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. त्यात प्रभास दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :प्रभासअनुष्का शेट्टी