‘बाहुबली2’मध्ये प्रभासचा ‘डबल रोल’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 10:50 IST
‘बाहुबली2’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा ‘बाहुबली2’ प्रदर्शित होतो अन् कधी नाही, असे सगळ्यांना ...
‘बाहुबली2’मध्ये प्रभासचा ‘डबल रोल’!!
‘बाहुबली2’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा ‘बाहुबली2’ प्रदर्शित होतो अन् कधी नाही, असे सगळ्यांना झाले आहे. या उत्सुकतेत आणखी एक भर घालणारी गोष्ट म्हणजे, या चित्रपटात अभिनेता प्रभास ‘डबल रोल’मध्ये दिसणार आहे. होय, सध्या सगळीकडे या एकाच गोष्टीची चर्चा आहे.‘बाहुबली2’मध्ये प्रभास दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. एकीकडे तो शिवुडू (महेंद्र बाहुबली)ची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात त्याचे वजन ८६ से ८८ किलो आहे तर दूसरीकडे तो बाहुबली (अमरेंद्र बाहुबली)ची भूमिका वढवणार आहे. यात त्याचे वजन १०५ किलो आहे. यासाठी अभिनेता प्रभासने मिस्टर वर्ल्ड असलेल्या लक्ष्मण रेड्डीकडून खास ट्रेनिंग घेतले. या भूमिकांसाठी प्रभासने दोन वेळा स्वत:चे वजन वाढवले आणि कमी केले.ALSO READ : OMG!! ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर उडणार प्रभासच्या लग्नाचा बार?२०१० मध्ये ‘मिस्टर वर्ल्ड’चा किताब जिंकणाºया लक्ष्मण रेड्डी यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बाहुबलीच्या भूमिकेसाठी प्रभासला वजन वाढवण्याची गरज होती. तर शिवुडूच्या भूमिकेसाठी त्याला वजन कमी करण्यासोबतच टोंड बॉडी हवी होती. प्रभासने यासाठी खूप मेहनत घेतली. दिवसभराच्या शूटींगनंतर तो अर्ध्या तासाचा कार्डिओ करायचा. यादरम्यान तो कडक डाएटवर होता. शिवुडूच्या भूमिकेसाठी त्याचे सगळे कार्बोहाड्रेट बंद करून केवळ त्याला प्रोटीन दिले जात होते. अंडी, चिकन, बादाम, मासे आदींचा यात समावेश होता. बाहुबलीच्या भूमिकेसाठी नंतर त्याला मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट दिले गेलेत. प्रभासला बिर्यानी जीवापाड आवडते. पण २० दिवसांत एकदाच त्याना बिर्याणी मिळायची. अनेकदा प्रभासला जंक फूड खायची अनावर इच्छा व्हायची. पण त्याने शिस्त कधीच तोडली नाही. कधीकधी मध्यरात्री उठून कसरत करावी लागायची. पण प्रभासने कशालाच नाही म्हटले नाही. त्याचा त्याग आणि चिकाटी अद्भूत होते.