Join us

प्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आहे खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:05 IST

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

ठळक मुद्देप्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखी एक खुशखबर आहेसध्या तो साहोच्या शूटिंगमध्ये झाले आहे

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रभास फेसबुकच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतो. प्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखी एक खुशखबर आहे. फेसबुकनंतर आता प्रभास इन्स्टाग्रामवर डेब्यू करणार असल्याचे समजतेय. 

सध्या तो साहोच्या शूटिंगमध्ये झाले आहे, प्रभास सिनेमासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहेत. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

'साहो'च्या अ‍ॅक्शनसाठी, हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात आलेली आहे जी प्रभासला वेगळ्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या ५० लोकांची टीम प्रत्येक लहान लहान हालचाली पासून ते प्रत्येक फ्रेम बद्दल प्रभासला ट्रेनिंग देणार आहेत. ज्यामुळे अ‍ॅक्शन सीन अधिक प्रभावी होईल.

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी सिनेमात असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे. प्रभासला 'साहो' सिनेमात अ‍ॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :प्रभासबाहुबली