Join us

काय सांगता! प्रभास पुन्हा बनणार महेंद्र बाहुबली? राजमौलींनी सुरू केली ‘बाहुबली 3’ची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:09 IST

Baahubali 3 : प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’  येत्या 11 मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. साहजिकच ‘बाहुबली’ प्रभास चर्चेत आहे. पण चर्चा फक्त इतकीच नाही तर प्रभासबद्दल आणखी एक चर्चा कानी येतेय.

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’  येत्या 11 मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. साहजिकच ‘बाहुबली’ प्रभास चर्चेत आहे. पण चर्चा फक्त इतकीच नाही तर प्रभासबद्दल आणखी एक चर्चा कानी येतेय. होय, प्रभास पुन्हा एकदा ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली (S S Rajamouli ) यांच्यासोबत काम करणार आहे. खुद्द प्रभासने एका मुलाखतीत याचे संकेत दिले आणि त्यावरून ‘बाहुबली 3’ (Baahubali 3)येणार, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.

‘बाहुबली’चे दोन भाग आपण पाहिलेच. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. यानंतर ‘बाहुबली 1’ आणि ‘बाहुबली 2’नंतर ‘बाहुबली 3’ येणार, अशी चर्चा यापूर्वी अनेकदा झाली. पण या सगळ्या अफवा ठरल्या. दिग्दर्शक एस. एस. राजमौली ‘आरआरआर’मध्ये बिझी झालेत आणि प्रभास त्याच्या नव्या सिनेमात गुंतला. पण आता ‘बाहुबली 3’वर काम सुरू झाल्याची चर्चा आहे.बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बाहुबली 3’साठी प्रभास आणि राजमौली लवकरच एकत्र येऊ शकतात. अर्थात इतक्यात नाही तर यासाठी वेळ लागणार. कारण राजमौली व प्रभास दोघंही सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.

‘आरआरआर’नंतर राजमौली तेलगू सुपरस्टार महेशबाबूसोबतचा आपला सिनेमा पूर्ण करतील. प्रभासही ‘आदिपुरूष’नंतर सालार आणि अन्य काही प्रोजेक्ट हातावेगळे करेल. साहजिकच, ‘बाहुबली 3’साठी प्रेक्षकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल. ‘बाहुबली’सीरिजने जगभर धुमाकूळ घातला होता. विक्रमी कमाई केली होती. प्रभास तर या चित्रपटानंतर जणू चाहत्यांच्या गळ्यातीत ताईत बनला.

टॅग्स :प्रभासएस.एस. राजमौलीबाहुबली