Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रभास अन् अनुष्का शेट्टी डिसेंबरमध्ये करणार साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:31 IST

कालच ‘बाहुबली’ प्रभास आणि ‘देवसेना’ अनुष्का शेट्टीबद्दलची एक बातमी आम्ही तुम्हाला दिली होती.  ‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या ...

कालच ‘बाहुबली’ प्रभास आणि ‘देवसेना’ अनुष्का शेट्टीबद्दलची एक बातमी आम्ही तुम्हाला दिली होती.  ‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या थांबायला तयार नाहीत. आता तर या चर्चा ऐकून ऐकून प्रभासही गोंधळला आहे. त्याच्यात अन् अनुष्कामध्ये खरोखरचं काहीतरी आहे, असे त्याला वाटू लागलेय. ताज्या मुलाखतीत प्रभास हे बोलून गेला.  ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास या मुलाखतीत बोलला. अर्थात त्याचे हे बोलणे अनेकांनी हसवण्यावारी नेले. पण कदाचित हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही. मामला जरा सीरिअस आहे. ताजी बातमी तशीच आहे. अनुष्का व प्रभास येत्या डिसेंबरमध्ये साखरपुडा करणार असल्याची बातमी आहे. अनुष्काने याचसाठी आपले वाढलेले वजन कमी केल्याचेही मानले जातेय.‘बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्यांनी प्रचंड जोर धरला आहे. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या वेळोवेळी नाकारल्या आहेत. आम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे दोघेही सांगत आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभासने आपल्या आॅनलाईन पोर्टलवर एक खुलासाही दिला होता. ‘मला माझे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणण्यात कुठलाहीरस नाही. माझे अफेअर आहे का? मी लग्न करणार आहे का? असे अनेक लोक मला विचारतात. जे मला ओळखत नाहीत तेही विचारतात. कृपा करून मला लग्नाबद्दल विचारू नका. मी जेव्हा लग्न करेल, तेव्हा तुम्हा सगळ्यांना सांगून करेल,’ असे प्रभासने लिहिले होते. अर्थात तरिही अनुष्का व प्रभासबद्दलच्या बातम्या थांबलेल्या नाही. आता तर दोघेही साखरपुडा करणार, अशी बातमी आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे, ते वेळच सांगेल. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा!ALSO READ : प्रभास म्हणतो, आता तर मलाही माझ्यात व अनुष्कात काहीतरी आहे असे वाटू लागलेयं!