POSTER OUT : ‘बुधिया सिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:51 IST
रिमी सेन आठवतेय? नाही? अहो ‘धुम’ चित्रपटातील अभिषेकची बायको. आता आठवले असेल.तर झालं असंय की, रिमीचे अॅक्टिंग करिअर ...
POSTER OUT : ‘बुधिया सिंग’
रिमी सेन आठवतेय? नाही? अहो ‘धुम’ चित्रपटातील अभिषेकची बायको. आता आठवले असेल.तर झालं असंय की, रिमीचे अॅक्टिंग करिअर काही तग धरू शकले नाही. मागच्या वर्षी ‘बिग बॉस’मध्ये नशीब आजमावून पण झाले.अखेर तिने कॅमेऱ्या मागे येण्याचा निर्णय घेतला आणि आता निर्माता पुन्हा बॉलिवूडमध्ये नवी इनिंग सुरू करण्यास ती सज्ज झाली आहे.तिने प्रोड्युस केलेला पहिला चित्रपट ‘बुधिया सिंग’चे ट्विटरवर पोस्टर लाँच करण्यात आले आहे.ओडिशातील सर्वात तरुण मॅरेथॉनपटूच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये मनोज वाजपेयी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘बिरांची दास’ असे त्याच्या पात्राचे नाव आहे. आॅगस्ट महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. }}}}रिमीच्या या नव्या करिअरला यश मिळो यासाठी आमच्याकडून शुभेच्छा!