Join us

पूनम पांडेचा पूर्ण कपड्यातील संस्कारी लूक बघून चाहते झाले दंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 21:33 IST

​सोशल मीडियावर बोल्ड आणि बिंधास्त फोटो अपलोड करण्यास प्रसिद्ध असलेली पूनम पांडेने यावेळेस मात्र पूर्ण कपड्यांमधील काही फोटोज अपलोड केले.

सोशल मीडियावर बोल्ड आणि बिंधास्त फोटो अपलोड करण्यास प्रसिद्ध असलेली पूनम पांडेने यावेळेस मात्र पूर्ण कपड्यांमधील काही फोटोज अपलोड केले. परंतु नेहमीच पूनमला बोल्ड फोटोमध्ये बघण्याची चाहत्यांना सवय झाल्याने तिचे हे पूर्ण कपड्यातील फोटो चाहत्यांना फारसे भावलेले दिसत नाहीत. त्यामुळेच तिच्या या संस्कारी लूकची खिल्ली उडविली जात आहे. पूनम गणरायाच्या दर्शनासाठी गेली होती. गणेशाच्या मूर्तीसमोर ती हात जोडून उभी असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. दरम्यान, पूनमच्या या फोटोवर युजर्सकडून मजेशीर कॉमेण्ट दिल्या जात आहेत. एका युजर्सने लिहिले की, ‘तुला पूर्ण कपड्यांमध्ये बघून आम्ही दंग राहिलो आहोत.’ तर एका युजर्सने लिहिले की, ‘संस्कार पूनम हे पचवायला जरा जड जात आहे.’ पूनमने तिचे हे फोटो सात तासांपूर्वी अपलोड केले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे १४ हजार लोकांनी या फोटोला लाइक केले आहे. फोटो कॅप्शनमध्ये पूनमने लिहिले की, ‘गणरायाकडून आशीर्वाद मिळाला. गणपती बाप्पा मोरया’  आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, पूनमने अंधेरी येथे गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी पूनमने बाबा राम रहीमला मिळालेल्या शिक्षेवरही प्रतिक्रिया दिली. पूनमच्या या फोटोला एका युजर्सने प्रतिक्रिया दिली की, ‘केवळ हीच ती जागा आहे, ज्याठिकाणी आम्ही तुला संपूर्ण कपड्यांमध्ये बघू शकतो.’ असो, पूनमचा हा संस्कारी लूक तिच्या चाहत्यांना भावला नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे. पूनम नेहमीच तिचे बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करून खळबळ उडवून देत असते. ती सर्वात अगोदर चर्चेत तेव्हा आली होती जेव्हा तिने २०११ मध्ये ‘जर भारत मॅच जिंकला तर मी सर्व कपडे काढणार’ असे वक्तव्य केले होते. भारत मॅच जिंकल्यानंतर पूनमने तिचा एक नेकेड फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. आतापर्यंत तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर २७४ फोटोज् अपलोड केले आहेत.