Join us

पूजा हेगडेने 15 दिवसांच्या शूटिंगसाठी मेकर्सकडे मागितले 2 कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 10:39 IST

अभिनेत्री पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या  मोहजोंदारो सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात ती ऋतिक रोशनच्या अपोझिट दिसली होती

ठळक मुद्देवाल्मिकी सिनेमासाठी पूजाला अप्रोच करण्यात आले आहे तिला यात लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे

अभिनेत्री पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या  मोहजोंदारो सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात ती ऋतिक रोशनच्या अपोझिट दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तरीही साऊथ इंडिस्ट्रीमध्ये पूजाला कास्ट करण्यासाठी फिल्ममेकर्स तयार आहेत.    

आजतकच्या रिपोर्टनुसार, वाल्मिकी सिनेमासाठी फिल्ममेकरने पूजाला अप्रोच करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार तिला यात लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. हा सिनेमा जिगरठंडाचा रिमेक असल्याचे बोलले जातयं.पूजा फक्त 15 दिवसांच्या शूटिंगसाठी 2 कोटी मागितले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर्स अजून पूजाला एवढी रक्कम देण्यासाठी होकार दिला नाही.

पूजा गतवर्षी रिलीज झालेल्या 'हाऊसफुल ४'मध्ये दिसली होती. यासिनेमात  पूजा सह अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा यांच्या  प्रमुख भूमिक होत्या. साजिद खान दिग्दर्शित 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित होती. पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात तीन जूनियर एनटीआरसोबत दिसली होती.  

टॅग्स :पूजा हेगडे