Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ पूजाला झाला डेंग्यू, नाही करणार ‘मोहेंजोदडो’चे प्रमोशन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 19:04 IST

‘मोहेंजोदडो’ची अभिनेत्री पूजा हेगडे हिला डेंग्यू झाल्याची खबर आहे. त्यामुळे पूजा चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाही. ‘मोहेंजोदडो’मध्ये पूजाने चानीची ...

‘मोहेंजोदडो’ची अभिनेत्री पूजा हेगडे हिला डेंग्यू झाल्याची खबर आहे. त्यामुळे पूजा चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाही. ‘मोहेंजोदडो’मध्ये पूजाने चानीची भूमिका साकारली आहे. डेंग्यू होण्याआधीपर्यंत पूजा चित्रपटाच्या प्रमोशनात गुंतली होती. मात्र तीन-चार दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याचे तिला कळले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस तिला विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच ‘मोहेंजोदडो’च्या प्रमोशनमध्ये कदाचित पूजा नसेल. येत्या १२ आॅगस्टला ‘मोहेंजोदडो’ रिलीज होतो आहे. यात हृतिक आणि पूजाची रोमॅन्टिक स्टोरी दिसणार आहे.