Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा भटची आई दिसते खूपच सुंदर, पाहा त्यांचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 16:00 IST

महेश भट यांची पहिली पत्नी म्हणजेच पूजाची आई दिसायला खूपच सुंदर आहे.

ठळक मुद्दे पूजा तुझ्या आईचा फोटो पाहून एका क्षणासाठी या फोटोत तू कोण आणि तुझी आई कोण हे ओळखणे कठीण जाते असे पूजाचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात. 

बॉलिवूड अनिनेत्री पूजा भट्ट हिचा आज वाढदिवस. आज ती 49 वर्षांची झाली. पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत राहिली. पूजा भटने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. तिने दिल है के मानता नही, सडक, जुनून, बॉर्डर, जख्म यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची बहीण आलिया भटने देखील बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. आलिया भटची आई ही अभिनेत्री सोनी राझदान असून त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आलिया आणि पूजा या सावत्र बहिणी असून आलियाची आई अभिनेत्री असल्याने अनेकांना त्यांच्याविषयी माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, महेश भट यांची पहिली पत्नी म्हणजेच पूजाची आई देखील दिसायला खूपच सुंदर आहे. महेश भट यांच्या पहिल्या पत्नीचे खरे नाव लॉरेन ब्राईट असून शालेय जीवनात महेश आणि लॉरेन यांची ओळख झाली होती.

लॉरेन केवळ २० वर्षांच्या असताना त्यांनी महेश यांच्यासोबत लग्न केले आणि त्यांचे लग्नानंतर नाव बदलून किरण असे ठेवण्यात आले. त्यांना पूजा आणि राहुल अशी दोन मुले आहेत. पण काहीच वर्षांत त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले. महेश भट यांचे अफेअर अभिनेत्री परवीन भाभी यांच्यासोबत असल्याने किरण यांनी हा निर्णय घेतला होता.

किरण यांच्यानंतर महेश यांनी सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांनी किरण यांच्यासोबत कधीच घटस्फोट घेतला नाही. सोनी राजदान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. किरण या दिसायला अतिशय सुंदर असून त्यांची मुलगी पूजा अगदी त्यांच्यासारखीच दिसते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

पूजाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या आईचे अनेक फोटो पाहायला मिळतात. हे फोटो पाहिल्यानंतर पूजा तिच्या आईसारखीच दिसते हे लक्षात येते. पूजा तुझ्या आईचा फोटो पाहून एका क्षणासाठी या फोटोत तू कोण आणि तुझी आई कोण हे ओळखणे कठीण जाते असे पूजाचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात. 

टॅग्स :पूजा भटमहेश भट