वाशु भगनानी करणार पियर्स ब्रॉसनन सोबत चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:08 IST
बॉलीवूड चित्रपट निर्माता वाशु भगनानीचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट यशस्वी राहीले आहेत. हॉलीवूड अभिनेता पियर्स ब्रॉसनन सोबत असलेल्या फोटोवरुन ते ...
वाशु भगनानी करणार पियर्स ब्रॉसनन सोबत चित्रपट
बॉलीवूड चित्रपट निर्माता वाशु भगनानीचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट यशस्वी राहीले आहेत. हॉलीवूड अभिनेता पियर्स ब्रॉसनन सोबत असलेल्या फोटोवरुन ते दोघे चित्रपट तयार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये वाशु हे हँडसम जेम्स बांड सोबत दिसत आहेत. प्रियर्स ब्रॉसनन सोबत झालेल्या भेटीत वाशु एकटेच नाहीत. तर सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब सुद्धा आहे. फोटोमध्ये पियर्स आपल्या जेम्स बांड इमेजपासून खूप वेगळा वाटत असून, वाढलेली दाढी व सोबत सुट बुटातील पोशाख परिधान केलेला आहे. कुटुंबाला भेटण्यााठी वेळ दिल्याने ट्विटरवर वाशुने पियर्स ब्रॉसला धन्यवाद दिले आहे. वाशु व ब्रॉसननच्या भेटीचे अजूनही डिटेल्स समोर आलेले नाही. परंतु, वाशु मागील अनेक दिवसापासून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले असून, तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.