पारसी चाहत्यांसोबत ‘अक्की’ चे फोटोसेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 10:54 IST
अक्षय कुमार सध्या ‘रूस्तम’ चित्रपटाचे सर्वत्र प्रमोशन करत आहे. ‘रूस्तम पवरी’ या नेव्हीतील आॅफिसरची ही बायोपिक आहे. १९५० ला ...
पारसी चाहत्यांसोबत ‘अक्की’ चे फोटोसेशन!
अक्षय कुमार सध्या ‘रूस्तम’ चित्रपटाचे सर्वत्र प्रमोशन करत आहे. ‘रूस्तम पवरी’ या नेव्हीतील आॅफिसरची ही बायोपिक आहे. १९५० ला घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट असून त्याच्या पत्नीची भूमिका इलियाना डिक्रूझ हिने केली आहे. रूस्तम पवरी हा पारसी असतो.त्यांच्या लग्नाचा सीन शूट करत असतांना अक्षय कुमार आणि इलियाना हे दोघेही पारसी वेशभूषेत येतात. त्यावेळी खरंचच रूस्तम पवरी आला की काय? असे वाटू लागले.चित्रपटाच्या टीमने हा सीन पारसी समाजातील काही मित्रांच्या उपस्थितीत साकारणे योग्य समजले. सीन शूट झाल्यानंतर सर्वांनी अक्षय कुमारसोबत फोटो काढण्यासाठी घाई केली. थोडा वेळ फोटोसेशन झाल्यावर सर्वांनी अक्कीसोबत गप्पाटप्पा मारल्या.