Join us

श्रीदेवीने ‘या’ साप्ताहिकासाठी केले फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 14:04 IST

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी तब्बल पाच वर्षांनंतर ‘मॉम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतत आहे. सध्या श्रीदेवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी तब्बल पाच वर्षांनंतर ‘मॉम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतत आहे. सध्या श्रीदेवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, याचेच निमित्त साधून ‘फिल्मफेयर’ या साप्ताहिकासाठी एक फोटोशूटही केले आहे. फोटोशूटमध्ये श्रीदेवीचा अंदाज बघण्यासारखा असून, तिचे सौंदर्य वेड लावणारे आहे. आपल्या जमान्यात पडदा गाजविणाºया श्रीदेवीच्या रूपात किंचितही बदल झालेला नाही. आजही श्रीदेवीचा अंदाज पूर्वीसारखाच वाटतो.  सध्या श्रीदेवी तिच्या ‘मॉम’ या चित्रपटामुळे आणि आपल्या मुलीच्या डेब्यूमुळे सारखी चर्चेत असते. या चित्रपटात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अक्षय खन्ना याच्याबरोबर बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीज केला जाणार होता. परंतु आता ७ जुलै रोजी रिलीज केला जाणार आहे. रवि उदयवार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला पती बोनी कपूर आणि जी स्टूडिओने प्रोड्यूस केले आहे. त्याचबरोबर चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनी संगीत दिले आहे. दरम्यान, श्रीदेवीने केलेल्या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या साप्ताहिकाच्या कव्हर पेजसाठी श्रीदेवीने हे फोटोशूट केले आहे. फोटोंमधील श्रीदेवीचे हास्य प्रेमात पाडणारे असून, तिचे हे फोटो बघून जुन्या जमान्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. श्रीदेवीच्या दोन्ही मुली सध्या डेब्यूची तयारी करीत आहेत. मात्र अशातही श्रीदेवीचा बॉलिवूडमधील जलवा कमी झालेला दिसत नाही. या फोटोंवरून ते प्रकर्षाने स्पष्ट होते.