Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटाग्राफर्सना बाऊन्सर्सची बेदम मारहाण, झाली अटक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:46 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना एका हॉटेलच्या बाऊन्सर्सनी बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोघा बाऊन्सर्सना ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना एका हॉटेलच्या बाऊन्सर्सनी बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोघा बाऊन्सर्सना अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली.  सेलिब्रिटी म्हटले म्हणजे त्यांच्या अवतीभोवती चाहत्यांची गर्दी होतेच. त्यातच फोटोग्राफर्स असतील तर त्यांचा मोह आवरणे कठीणच असते.  शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा रात्री जेवणासाठी खार येथील एका हॉटेलमध्येगेले असता जेवणानंतर दोघेही हॉटेलबाहेर आल्यानंतर काही फोटोग्राफर त्यांचे फोटो काढू लागले. त्याचवेळेस हॉटेलच्या बाऊन्सर्सनी फोटो काढण्यास मनाई केली. मात्र, फोटोग्राफर्सनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा निघून गेल्यानंतर बाऊन्सर्सनी अचानक मारझोड करण्यास सुरूवात केली. थोड्याच वेळात तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या मारहाणीत दोन फोटोग्राफर्सना जास्त लागले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी फोटोग्राफर्सनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्थानकात बाऊन्सर्सच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.