Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुलकीतने दिल्या फोटोग्राफर्सना शिव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 11:17 IST

‘स्टारडम’सोबत चांगल्या बरोबर अनेक वाईट गोष्टीही येतात. तुम्ही तुमचे स्टारडम कसे सांभाळता यावरच तुमचे करिअर अवलंबून असते.एक फिल्म ...

‘स्टारडम’सोबत चांगल्या बरोबर अनेक वाईट गोष्टीही येतात. तुम्ही तुमचे स्टारडम कसे सांभाळता यावरच तुमचे करिअर अवलंबून असते.एक फिल्म हिट झाली म्हणून हवेत डायचे नसते आणि फ्लॉप झाली तर खचून जायचे नसते. आता हे कोणी तरी पुलकित सम्राटला जाऊन सांगितले पाहिजे.पुलकित-यामी स्टारर ‘जुनूनियत’ बॉक्स आॅफिसवर सपाटून आदळल्यामुळे तो सध्या खूप निराश आहे. बहुधा यामुळेच त्याने आपला राग बिचाऱ्या फोटोग्राफर्सवर काढला.एअरपोर्टवर त्यांना पाहताच फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो घ्यायला सुरूवात केली. आता ते तर त्यांचे कामच आहे. परंतु हे काही पुलकितला रुचले नाही.त्याने छायाचित्रकाराला शिव्या दिल्या. एवढेच नाही तर फोटोग्राफरच्या मागे धावलासुद्धा. त्याच्या अशा या वागण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. पुलकित शांतपणे फोटोग्राफर्सना सांगायला हवे होते की, फोटो काढू नका. पण आता स्टार असल्याचा अविर्भाव त्याच्यामध्ये आला आहे.विरल भयानी या वरिष्ठ छायाचित्रकाराने इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली. त्याने लिहिले, पुलकितला फोटो काढू द्यायचे नव्हते हा त्याचा निर्णय आहे. आम्हाला तो मान्य आहे. परंतु असे असभ्य वर्तन करणे त्याच्यासारख्या अभिनेत्याकडून अपेक्षित नाही.