पलक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटोज् शेअर करीत असते. पलक तिवारीने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. कारण पलक या फोटोमध्ये खूपच हॉट अॅण्ड बोल्ड दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, श्वेता तिवारीची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. अभिनेता दर्शिल सफारी याच्यासोबत ती झळकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पलकच्या फोटोला युजर्सकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या जात आहेत. यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक कॉमेण्ट्सचा सहभाग आहे. पलकच्या या फोटोला आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. तिच्या चाहत्यांकडून तर तिच्यावर कौतुकाचा वर्षावच केला जात आहे.