Join us

बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीने शेअर केला फोटो; मिळतेय चाहत्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 17:25 IST

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पॅरिसमध्ये फॅशन वीकसाठी गेली आहे. तिच्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन असल्याचेही कळतेय. होय, ऐशने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून या फोटोत तिची मुलगी आराध्या आणि इंटरनॅशनल स्टार केमिला कॅबेलो ही देखील दिसत आहे.

बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पॅरिसमध्येफॅशन वीकसाठी गेली आहे. तिच्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन असल्याचेही कळतेय. होय, ऐशने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून या फोटोत तिची मुलगी आराध्या आणि इंटरनॅशनल स्टार केमिला कॅबेलो ही देखील दिसत आहे. या फोटोला सोशल मीडियावरून चाहत्यांचे लाइक्स मिळत आहेत. 

सुत्रांनुसार, पॅरिस येथे होत असलेल्या ‘फॅशन वीक’ मध्ये तिने फ्लोरल प्रिंटमध्ये असलेल्या ड्रेसमध्ये रॅम्पवॉक केल्याचे समजतेय. या रॅम्पवॉकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतेय. तिने शेअर केलेल्या एका फोटोत ती आराध्या आणि केमिला यांच्यासोबत दिसत आहे. तिने या दोघींसोबत छान पोझ दिली आहे. तिघी जणी या फोटोत खूप खूश दिसत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले आहेत. 

ऐशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या दिग्दर्शक मनी रत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटामध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारत असल्याचे समजतेय. ऐश्वर्या अत्यंत गुणी अभिनेत्री असून ती कायम तिच्या भूमिका चोखंदळपणे निवडते आणि त्याच्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते.                                

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनपॅरिसफॅशन