Join us
Daily Top 2Weekly Top 5

Phillauri : ‘शोले’मध्ये ‘या’ कारणामुळे जय बसला होता विरूच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 22:29 IST

सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अतिशय मजेशीर असा फॉर्म्युला मिळाला आहे. फोटोशॉपच्या मदतीने ...

सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अतिशय मजेशीर असा फॉर्म्युला मिळाला आहे. फोटोशॉपच्या मदतीने ती जगभरातील आयकॉनिक घटना किंवा सिनेमांमध्ये ‘फिल्लौरी’मधील तिचा शशी नावाच्या कॅरेक्टरचा फोटो पेस्ट करून सोशल मीडियावर शेअर करीत आहे. आतापर्यंत तिने आॅस्करसह चंद्रावर निल आर्मस्ट्रॉँगचे पहिले पाऊल या ऐतिहासिक फोटोसोबत स्वत:चा फोटो पेस्ट करून मिरवला आहे. आता तर तिने हद्दच केली. चक्क ‘शोले’ या सिनेमातील ‘ये दोस्ती’ या सुपरहिट गाण्यामध्ये बाइक चालविताना जय (अमिताभ बच्चन) याने विरूला (धर्मेंद्र) खांद्यावर घेतले असता बाइक ट्रॉलीमध्ये स्वत:चा फोटो पेस्ट करून धूम उडवून दिली आहे. १९७५ मध्ये रिलीज करण्यात आलेला हा सिनेमा बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी आयकॉनिक समजला जातो. त्याकाळी दोस्तीची मिसाल देणाºया ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ या गाण्याने धूम उडवून दिली होती. हे गाणे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात एक ट्रॉली असलेली बाइक दाखविण्यात आली होती. गाण्याच्या मध्यंतरात विरू म्हणजेच धर्मेंद्र बाइकच्या ट्रॉलीमधून उतरून जय अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर बसतो. त्यावेळी ट्रॉली रिकामी असते. या रिकाम्या ट्रॉलीमध्ये अनुष्काने तिचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता तुम्हाला समजले असेल की, वीरू जयच्या खांद्यावर का बसला आहे. कारण शशी ट्रॉलीमध्ये बसलेली होती’ अनुष्काच्या या फोटोने सध्या धूम उडवून दिली असून, नेटिझन्सकडून त्यास जबरदस्त पसंत केले जात आहे. दरम्यान, या सिनेमामध्ये अनुष्का भुताच्या भूमिकेत असून, मांगलिक मुलगा ‘सूरज शर्मा’ याच्याबरोबर तिचे लग्न होते. सिनेमाच्या फ्लॅशबॅकमध्ये अनुष्का आणि दिलजीत दोसांझ यांची लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमाची निर्मिती खुद्द अनुष्का शर्मा करीत आहे.