अर्जुन कपूरच्या दोन्ही सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर या ना त्या कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र अर्जुनती खरी बहिण अंशुला कपूर नेहमीच लाईमलाईटपासून दूर असते. अंशुला अर्जुनपेक्षा वयाने लहान आहे. मात्र त्याची प्रत्येक प्रतिक्रिया अर्जुनसाठी महत्त्वाची असते. ऐवढेच नाही तर अर्जुन आज हे काही आहे यात अंशुलाचा सिंहाचा वाटा आहे. हे आमचे नाही तर स्वत: अर्जुन कपूरचे म्हणणे आहे.
नवभारत टाईस्मला दिलेल्या मुलाखती दरम्यान अर्जुन कपूर म्हणाला कि, माझ्या कोणत्याही चित्रपटासाठी स्क्रिप्ट सगळ्यात आधी अंशुला वाचते. माझा प्रत्येक चित्रपट पाहून समीकक्षादेखील तिच करते. ती माझ्या प्रत्येक कामातल्या माझ्या चूका आधी दाखवते कारण ते काम मी अजून चांगल्या प्रकारे करु शकू.
अंशुला कपूर ही बोनी कपूर आणि त्यांची पूर्व पत्नी मोवा शौरी कपूर यांच्या मुलगी आहे. ती न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण करते आहे. अंशुला तेव्हा पाच वर्षांच्या होती ज्यावेळी बोनी कपूरने श्रीदेवीशी दुसरं लग्न केले.
अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट संदीप और पिंकी फरारच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.अर्जुन व परिणीत यांनी याआधी ‘इशकजादे’ मध्ये एकत्र काम केले आहे. ‘संदीप और पिंकी फरार’नंतर ही जोडी विपुल शाह यांच्या ‘नमस्ते कनाडा’मध्येही दिसणार आहे.