पीसीची जिमी फॅलॉनच्या शोवर मस्ती...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 21:11 IST
बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत प्रियंका चोप्राची जी घोडदौड सुरू आहे ती न थांबवता येण्यासारखी आहे.
पीसीची जिमी फॅलॉनच्या शोवर मस्ती...!
बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत प्रियंका चोप्राची जी घोडदौड सुरू आहे ती न थांबवता येण्यासारखी आहे. ती मल्टी टास्कर असून दोन्ही करिअरमधील मेळ तिला जमवता येऊ लागला आहे. आॅस्करच्या दिमाखदार सोहळ्यात उपस्थिती नोंदवून तिने सर्वांनाच खुप अभिमानाने भारून टाकले आहे.तिची अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’च्या पाय गुणाने तिला आता बेवॉच नावाचा चित्रपटही करायला मिळतो आहे. त्यासोबतच ती नुकतीच जिमी फॅलॉन याच्या शोवर रात्री आली होती. ती बॉलीवूडमधील पहिली सेलिब्रिटी आहे जी जिमी फॅलॉनच्या शोवर आली आहे. तिने तिथे खुप धम्माल केली. तसेच तिने हॉट विंग इटींग कॉन्टेस्ट मध्येही भाग घेतला होता.लॉरेटा लिन यांच्या म्युजिकल उपस्थितीत हा एपिसोड होता. हा शो खुप प्रसिद्ध आहे. या शो ला मार्टिन सोर्से, बेन स्टिलर, पेनलोप क्रुझ, रयान रेनॉल्ड्स, विल स्मिथ आणि अनेकांनी शो होस्ट केला आहे. देसी गर्लही खुपच एक्साईटेड वाटत होती या शोवर जाण्यासाठी. तिने टिवटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत.