Join us  

कंगना रनौतला दणका, नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने सोडला तिचा सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 11:38 AM

श्रीराम यांनी लिहिले की, 'मला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली जे त्यांनी समजून घेतली'.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमटोग्राफर आणि डायरेक्टर पीसी श्रीराम यांनी ट्विट करून नुकतीच माहिती दिली की, त्यांना कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ऑफर झाला होता. पण त्यांनी या सिनेमासाठी काम करण्यास नकार दिलाय. आपल्या काही ट्विट्समध्ये श्रीराम यांनी लिहिले की, 'मला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली जे त्यांनी समजून घेतली'.

कंगनाने दिलं उत्तर..

पीसी श्रीराम यांच्या ट्विटवर कंगनाने उत्तर दिलंय. तिने लिहिले की, 'मी तुमच्यासारख्या लीजंडसोबत काम करण्याची संधी गमावली सर. हे पूर्णपणे माझं नुकसान आहे. मला पूर्णपणे माहीत नाही की, तुम्हाला काय खटकतं होतं. पण मला आनंद आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं. तुम्हाला शुभेच्छा'. 

कंगना गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे. आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केल्याने तर वाद आणखीनच पेटला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिला हरामखोर मुलगी म्हटलं होतं. हा वाद पुढे इतका पेटला की, कंगनाला केंद्रातून सुरक्षा पुरवण्यात आली. ती आज मुंबईत दाखल होणार आहे. इथे मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेवर कंगनाचा हल्ला

कंगना राणौतनं ट्विटवरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता प्रहार केला आहे. कंगनानं म्हटलं आहे की, मी वयाच्या १२ वर्षी हिमाचलसोडून चंढिगड येथे हॉस्टेलला गेली. तिथून दिल्लीत आली त्यानंतर १६ व्या वर्षी मुंबईत आली. काही मित्रांनी सांगितले मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी ठेवते. आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सर्व मित्र परतले पण मुंबादेवीने मला तिच्या जवळच ठेवले असं ती म्हणाली.

हे पण वाचा :

Y सिक्युरिटी मिळालेली पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी ठरलीय कंगना; सुरक्षेचं कवच भेदणं कठीण!

शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड