Join us

विल स्मिथच्या बायकोसोबत पीसीची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 12:12 IST

आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोपडा आता पुरती हॉलीवूडच्या रंगात रंगून गेलेली आहे. टीव्ही सिरियल काय, चित्रपट काय, मॅगझीन कव्हर ...

आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोपडा आता पुरती हॉलीवूडच्या रंगात रंगून गेलेली आहे. टीव्ही सिरियल काय, चित्रपट काय, मॅगझीन कव्हर काय, पुरस्कार काय! अशा सगळ्याच बाबतीत हॉलीवूडला प्रियांका भावतेय.तिने ‘ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल’देखील होस्ट केला. यावेळी तिने अनेक नामांकित हॉलीवूड सेलिब्रेटिंसोबत धमाल केली. अभिनेत्री सलमा हायेक, सुपरस्टार विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट-स्मिथ यांच्यासोबत बॅकस्टेज काढलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.पाकिस्तानी फिल्ममेकर शरमीन ओबेदने हा फोटो शेअर करताना लिहिलेले की, महिलांसाठी हे जग कशा प्रकारे चांगले बनवले जाऊ शकते याविषयी बोलण्यास जाण्यापूर्वी काढलेला हा फोटो.तत्पूर्वी ‘क्वाटिंको’च्या दुसऱ्या पर्वाचे प्रक्षेपण सुरू झाले असून संपूर्ण टीमला तिने आपल्या न्यूयॉक येथील घरी पार्टी दिली होती. चला म्हणजे बॉलीवूडनंतर प्रियांका हॉलीवूडमध्येसुद्धा आपला दबदबा निर्माण करीत आहे.