Join us

कॅटरिनाला करायचेय पॅचअप; पण रणबीरला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 14:50 IST

रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांचा ब्रेकअप झाल्याने ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटिंग अनेकवेळेस थांबवल्या गेली. त्यानंतर सर्वांच्या चर्चेचा ...

रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांचा ब्रेकअप झाल्याने ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटिंग अनेकवेळेस थांबवल्या गेली. त्यानंतर सर्वांच्या चर्चेचा मुद्दा त्यांचा बे्रकअप ठरला. शूटिंगच्यावेळी देखील त्यांच्यात कुठल्याच प्रकारचे संभाषण नसायचे.पण, आता नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, म्हणे कॅटरिना पॅचअप करण्यासाठी रेडी असून रणबीर कपूर पॅचअपसाठी तयार नसल्याचे कळते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना रणबीरकडे गेली होती तिने त्याला विचारले की, आपण आपल्या नात्याला अजून एक संधी दिली तर?तेव्हा त्याने कुठलेच उत्तर तिच्या प्रश्नाला दिले नाही. मात्र, त्याच्या अशा वागण्यामुळे ती पूर्णपणे नाराज झाली आहे.