तिने पोर्टलला जशास तसे उत्तर देताना लिहिले की, ‘तुम्ही बरोबर म्हणत आहेत. मी एक चांगला गाउन परिधान करून अन् डोक्याच्या केसाची नीटनेटकी रचना करून सातवीच्या वर्गात जायला हवे होते. तेव्हा कदाचित तुम्हाला चांगली हेडलाइन मिळाली असती.’ दिशाने आतापर्यंत केवळ दोनच बॉलिवूडपट केले आहेत. मात्र अशातही तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.
बरेलीमध्ये जन्मलेली दिशा २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंदूरची रनरअप राहिली आहे. दिशा लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. त्यामुळेच वैज्ञानिक बनण्याचे ती स्वप्न बघत होती. मात्र तिच्या नशिबात वेगळेच होते. २०११ मध्ये लखनऊ एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने फॅशन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये आलेल्या ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात झळकली.